श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

माघ शुक्ल प्रतिपदा ते पंचमी

श्री. बल्लाळेश्वर देवाचा उत्सव माघ शु.प्रतिपदा ते माघ शु.पंचमी असा पाच दिवस उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव भव्य (मोठया) स्वरूपाचा असतो.

१.      सदर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी संस्थेचे विश्वस्तमंडळ हे सर्व सभासद व सेवेकरी गुरव यांची उत्सवाचे अगोदर 15 दिवस सर्वसाधारण सभा आयोजित करतात

२.      उत्सवाप्रित्यर्थ दोन दिवस (पौष कृष्ण चतुर्दशी व आमावास्या ) अगोदर सेवेकरी गुरव मंडळी संपुर्ण मंदिराची साफसफाई करतात.

३.      देवाला दोन दिवस अगोदर शेंदूर लेपन केले जाते. त्यावेळी भाविकांना देवाचे दर्शन लांबूनच दिले जाते.

४.      संपुर्ण मंदिर परीसरात व मंदिरापासूनच्या 150 मीटरच्या परीसरात विविध प्रकारच्या साहीत्याने सजविलेले सुशोभित प्रवेशद्वार, मंडप,विद्यूत रोषणाई,ध्वनिक्षेपक व्यवस्था या व्यवस्था मोठया स्वरूपात केल्या जातात.

५.      प्रतिपदेला पहाटे पाच वाजता मंगलवाद्य ( सनई चैघडा ) वाजविले जाते.देवाची नित्य पुजा पहाटे केली जाते. त्यावेळी उत्सवानिमित्त देवाला सर्व सुवर्णालंकार घालतात. प्रतिपदेला सकाळी 8.00 वा. उत्सवाचा आरंभ पुण्याहवाचनाने होतो. स्थानिक विद्वान गुरूजी व देवस्थानचे पुजारी यांचे पौरोहीत्यानुसार मंदिराच्या सभामंडपात पुण्याहवाचन होते. पुण्याहवाचनाचे यजमानपद हे विश्वस्तांना असते.

६.      पुण्याहवाचनाच्या कार्यक्रमासाठी सभासदांना व भाविकांना जाहीर आमंत्रण असते. पुण्याहवाचन संपल्यावर सर्वाना पेढयाचा प्रसाद दिला जातो. व त्यानंतर पुण्याहवाचनाच्या कार्यक्र्रमासाठी आलेल्या सर्वाना चहा पानाची व्यवस्था करण्यात येते.

७.      त्यानंतर यजमानांच्या हस्ते उत्सवाप्रित्यर्थ सहस्त्र आवर्तनाचा संकल्प व देवाची शोडषोपचार पूजा केली जाते. त्यांनतर देवावर अभिषेकपात्र लावून  अभिषेक मंडळातर्फे देवावर सहस्त्र अथर्वशीर्षांचे पठण केले जाते.

८.      त्यांनतर सकाळी 11.00 वाजता उत्सवाप्रित्यर्थ देवाला नहाण घालून पुन्हा पुर्ण पुजा, पोशाख, नैवेद्य व आरती केली जाते. त्यांनतर देवस्थान मार्फत पुण्याहवाचना निमित्त ब्राह्मण भोजन असते तसेच पुण्याहवाचनाला उपस्थित भाविकांना व सभासदांना (सर्व कुटूंबियांना ) भोजन दिले जाते.

९.      सकाळी 11.00 वाजता उत्सवाप्रित्यर्थ देवाला नहाण घालून पुन्हा पुर्ण पूजा,पोशाख,सर्व सुवर्णालंकार घालणे, नैवेद्य व आरती हा कार्यक्रम प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस असतो.

१०.   या उत्सवकालावधीमध्ये प्रतिपदा ते चतुर्थी या चार दिवशी पार्थिव उत्सव मूर्ती म्हणून रोज सकाळच्या 10 वाजताच्या पुजेच्या वेळी मातीची छोटी गणपतीची मूर्ती शेंदूर लावून वगैरे तयार करतात. मुख्य मूर्ती बरोबर त्या मूर्तीचीही पूजा करतात.व ती मातीची मूर्ती दूसÚया दिवशी मंदिरासमोरील तलावात विर्सजन करतात.

११.   द्वीतियेला सायंकाळी 6 वाजता देवस्थानचे गुरूती,विद्यान गुरूजी यांचेतर्फे उत्सवाप्रित्यर्थ सभांडपात मंत्रजागर केला जातो. व नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता आरती,मंत्रपुष्प केला जातो.

१२.   त्यानंतर प्रतिपदा ते तृतीया रोज रात्री 9.30 ते 12.00 नारदिय कीर्तन असते. व कीर्तनानंतर प्रसाद वाटला जातो.( खोबरे व पीठी साखर मिश्रीत ) कीर्तनानंतर मंदिर बंद होते.

१३.   चतुर्थीच्या दिवशी कार्यक्रम वेगळा असतो.सकाळी 11 वाजेपर्यंत नहाण व पोशाखा पर्यंतचे कार्यक्रम आहेत ते तसेच होतात. व सकाळी 11.00 वाजता जन्माचे कीर्तन सुरू होते.

१४.   कीर्तनामध्ये 12.39 वा.श्रींचा जन्म होतो. जन्माचे वेळी देवस्थानात एक गणपतीची मुर्ती असलेली एक चांदिची  फ्रेम आहे तिला नहाण घालतात. पोशाख घालतात व देवाला पाळण्यात घालून नाव ठेवतात व कीर्तनकारबुवा पाळणा म्हणतात. व त्यांनतर ती मुर्ती सर्व श्रोत्यांना दर्शनासाठी फिरविली जाते. व नंतर ती मुर्ती मंदिरात ठेवतात व त्यानंतर भैरवी ,आरती होऊन जन्मोत्सव कीर्तनाची सांगता होते.

१५.   जन्मोत्सवाच्या कीर्तनाच्या वेळी कीर्तनाचा प्रसाद म्हणून सुंठ पावडर व पीठी साखर एकत्र केलेल्या प्रसादाचा नैवेद्य देवला दाखवितात व नंतर तो सुंठवडा प्रसाद सर्व कीर्तन श्रोत्यांना व भाविकांना त्यावेळी वाटतात.

१६.   संध्याकाळी 5 वाजता देवाची आरती केली जाते व भजनी मंडळाचे भजनासोबत पालखीची मिरवणूक निघते. पालखीसमोर भजन सेवेसाठी सुधागड तालुक्यातील सर्व गावांतील मंडळांना उत्सवाची आमंत्रण पत्रिका पाठविली जाते.पालखी समोर बॅन्ड,ढोल ताशा पथक,चैघडा इत्यादी प्रकारची सेवा श्रींच्या पालखी मिरवणूकीत असतात.

१७.   जन्मोत्सवाचे दिवशी सायंकाळी 5.00 वा. पालखीतील देवांची पुजा व प्रथम पालखी उचलणे या करीता मा. तहसीलदार साहेबांना दोन दिवस अगोदर आमंत्रण सेवेकरी गुरव करतात.

१८.   पालखीमध्ये चांदिची गणपतीची प्रतिमा, शंकरांचा चांदिचा मुखवटा, हे देव गुरव ठेवतात. व त्यांनंतर गावच्या मा. तहसीलदारांतर्फे व अध्यक्षांतर्फे पुजा करून प्रथम तहसीलदारांच्या हस्ते पालखी उचलली जाते व नंतर भोई लोक संपुर्ण मिरवणूकीमध्ये देवाची पालखी वाहण्याचे काम करतात.

१९.   ही पालखी श्री बल्लाळेश्वरांचे मंदिरातून निघून श्री केदारेश्वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री कालिका माता मंदिर,श्री लक्ष्मी नारायण मंदिर,श्री मरीमाता मंदिर,श्री राम मंदिर, श्री दत्त मंदिर  श्री मल्लिकार्जून मंदिर, श्री धुंडीविनायक मंदिर अशा प्रकारे बाजारपेठेतून पुन्हा श्री बल्लाळेश्वरांचे मंदिरात साधारणपणे रात्री 1.00 वाजेपर्यंत परत येते. त्यांनंतर देवासमोर विडा म्हणतात व देवाला आलेले पेढे ,गुळ, खोबरे वगैरे असा एकत्र प्रसाद सेवकरी गुरव देतात व तो उपस्थित सर्वांना वाटला जातो.तसेच त्याच वेळेला लगेचच मंदिराच्या सभामंडपातच सदर उत्सवात ज्यांनी ज्यांनी सेवा, सहकार्य केले अशा सर्व सेवेकÚयांना श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ (नारळ ) देतात. दुसÚया दिवशी दुपारी प्रसाद भोजनाचे जाहीर आमंत्रण करतात. तसेच पालखी समोर सेवा करणाÚयां सेवेकरी मंडळींना अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था केलेली असते त्यानुसार त्यांना अल्पोपहार दिला जातो.  व पालखीचा कार्यक्रम समाप्त होतो

२०.   त्या नंतर देवाच्या महानैवेद्याचा कार्यक्रम सुरू होतो. पालखीचा कार्यक्रम आटपल्यावर लगेचच श्री बल्लाळेश्वरांचा आंतरगाभारा व मध्य गाभारा ब्रह्मवृंद मंडळी पाण्याने स्वच्छ धुतात. त्यानंतर देवाची पुजा,पोषाख करतात.सर्व सुवर्णालंकार घालतात. नंतर रात्री साधारणपणे 3.00 वा. देवाला महानैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

२१.   पुजारी व उपस्थित ब्रह्मवृंद केळीच्या पानावर देवाला महानैवेद्य वाढतात. महानैवेद्यात साधारण 33 प्रकार ( भाज्या 7 प्रकारच्या, भात 21 कीलो, पापड, फेण्या,भरडयाचे वडे, घारगे, पुरणपोळी, मोदक, पुऱ्या, लाडू असे पदार्थ 21 या संख्येत असतात. तसेच लिंबू, चटणी, मेतकुट, कोशिबिर, दही, तुप, साखरभात, श्रीखंड, खीर, गोडवरंण, अळूभाजी, ) व विडा दक्षिणा असे साधारणपणे 33 पदार्थ असतात.नैवेद्य वाढून झाला की पुजारी देवासमोर पुरणाचे दिवे लावतात.दोन्ही बाजूला समया लावतात.पंचारती ओवाळतात, धुप ओवाळतात व नैवेद्याभोवती पाणी पोक्षण करून प्रार्थना करतात व आंतरगाभाÚयाचा दरवाजा बंद करून बाहेर येतात.

२२.   दरवाजा लावल्यानंतर मध्य गाभाÚयात उपस्थित गुरूजी साधारणपणे 15 मिनिटे मंत्र म्हणतात. व नंतर दरवाजा उघडतात. दरवाजा उघडताना नगारा वाजवतात व नंतर महानैवेद्य पाहण्यासाठी भाविकांना दर्शन सुरू केले जाते.  अशा पध्दतीने देवाला महानैवेद्य अर्पण केला जातो.

२३.   महानैवेद्यानंतर साधारणपणे  1 तासांनी आरती करून देवाची पालखी काढली जाते. ती पालखी श्री धुंडीविनायक मंदिरापर्यंत जाऊन परत श्री बल्लाळेश्वरांच्या मंदिरात येते. नंतर विडा म्हणतात. व नंतर सदर उत्सवात महानैवेद्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे महानैवेद्य सकाळी 6.00 वाजेपर्यंत ठेवतात त्यानंतर सेवेकरी गुरव महानैवेद्य उचलतात.

२४.   त्यांनंतर पोशाख उतरवून पुन्हा सकाळी पंचमीला सकाळी पुजा,सकाळचे नहाण पोशाख, नैवेद्य आरती असे नैमित्तिक कार्यक्रम होतात.

२५.   पंचमीच्या दिवशी देवाला संपुर्ण पांढÚया रंगाचा पोशाख करण्याची परंपरा आहे.

२६.   दुपारी 11 ते 2 या वेळेत .भक्तनिवास क्र. 1 येथे उत्सवानिमित्त महाप्रसाद (प्रसाद भोजन) हे सर्व भाविकांसाठी असते. ती व्यवस्था केली जाते.

२७.   सदर प्रसादामध्ये आदल्या दिवशी रात्री देवाला दाखविलेल्या महानैवेद्यामधील थोडास पदार्थ या जेवणात प्रसाद म्हणून एकत्र करतात.

२८.   नंतर पंचमीच्या दिवशी सायंकाळी आरती मंत्रपुष्प केले जाते व त्या दिवशी जून्या परंपरेनुसार रात्री लळीतानिमित्त सभासदांतर्फै नाटक सादर केले जाते. हा नाटयप्रयोग देवस्थानला सलग्न असलेल्या गणेश मंडळ या संस्थेतर्फे सादर केला जातो. सदर नाटयप्रयांगासाठी आवश्यक ते सहकार्य देवस्थानतर्फे केले जाते.

२९.   रात्री सदर नाटय प्रयोगाचे दिवशी पंचमीला मंदिर रात्रभर उघडे ठेवले जाते. व लगेचच पहाटे 5.00 वाजता लळीताचे कीर्तन सुरू होते.

३०.   लळीताच्या कीर्तनाचे वेळी उपस्थित सर्व पुरूष मंडळींना कीर्तनकार बुवांच्या हस्ते कीर्तनातच प्रसाद म्हणून श्रीफळ (नारळ) दिला जातो. व कीर्तनानंतर सर्वांना ओले खोब्रे, खडीसाखर, व दोन खारका असा प्रसाद दिला जातो.

३१.   नंतर बुवांना,साथीदारांना बिदागी देण्यात येते.

३२.     लळीताचे कीर्तन झाले पुर्वी पासून पेटीफंड मोजण्याची प्रथा आहे त्यानुसार कीर्तनानंतर विश्वस्त लगेचच 8 वा. पेटीफंड मोजण्यासाठी येण्याचे आमंत्रण फक्त सभासदांना देतात. त्यानुसार पेटीफंड उघडला जातो. मोजमाप, पंचनामा केला जातो. उपस्थितांच्या सहया घेतल्या जातात. सर्व स्भासदांना अल्पोपहार व चहापान दिला जातो.

३३.     त्यांनंतर षष्ठीच्या दिवशी लळीतानंतर सकाळी 8 वा देवाची नित्यपूजा केली जाते.